आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसूल:16 लाखांचा कर थकवलेल्या चार मालमत्ता मनपाने केल्या सील

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी बीड बायपास रोडवरील सावित्री लॉन्सकडून सात लाखांचा थकीत मालमत्ता कर वसूल केला, तर चार मालमत्ता सील केल्या. सिडको एन-२ मधील सदाशिवनगरात नंदिनी देशमुख यांच्याकडे १२ लाख ३७ हजार ८४५ रुपयांचा कर थकीत हाेता. रामनगरातील सुमन सुर्वे यांच्याकडे ४१ हजारांचा कर थकीत असल्याने दाेन्ही मालमत्ता सील करण्यात आल्या. चिकलठाणा येथे आठ लाखांचा कर थकीत असलेली मालमत्ता, गणेश कॉलनी येथे दोन लाख ८३ हजार ६१७ रूपयांचा कर थकीत असल्याने या मालमत्तेला टाळे ठोकले.

बातम्या आणखी आहेत...