आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्तांचा आदेश:मनपा तीन दिवसांत घरोघरी मालमत्ता कर, पाणीपट्टीची बिले पोहोचवणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची बिले तीन दिवसांत नागरिकांना घरपोच देण्यात येतील. तयारीसाठी दोन दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. तीन दिवसांत ही बिले घरोघरी वाटण्यास सुरुवात झाली पाहिजे, असे आदेश मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले. १ सप्टेंबर रोजी यासंदर्भात स्वतंत्र बैठक झाली.

आतापर्यंत मनपाकडून तयार केलेल्या बिलांमध्ये काही त्रुटी असल्याने त्याचे वाटप झाले नाही. या सगळ्या चुका दोन दिवसांत सुधारा आणि मालमत्ता कर, पाणीपट्टी बिलांचे वाटप करा, अशा सूचना चौधरी यांनी दिल्या. कोरोनानंतर शहरात मनपाकडून विकासकामे सुरू झाली आहेत.सध्या मनपाचा दर महिन्याला किमान ४५ कोटी रुपचे खर्च आहे, मात्र वसुली ३० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे मनपाला उत्पन्न वाढवण्याशिवाय पर्याय नाही. मागील महिन्यात नवे मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मनपाच्या विविध विभागांच्या आढावा बैठका घेऊन परिस्थिती जाणून घेतली. महिनाभरानंतर आता सूचना देऊन कामकाजात बदल करण्यास सुरुवात केली आहे.

पाणीपुरवठा विभागाची बैठक
गुरुवारी पाणीपुरवठा विभागाची बैठक मनपा आयुक्तांनी घेतली. या बैठकीत प्रामुख्याने नवीन ईएसआर, जलकुंभासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय उन्हाळ्यात पाण्याची टंचाई कशी होणार नाही यासाठी आत्तापासूनच नियोजन सुरू करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...