आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंध:मनपा 17 सप्टेंबरला देणार आदर्श शिक्षक पुरस्कार ; यापूर्वी डॉ. निपुण विनायक यांच्या कार्यकाळात गौरवण्यात आले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील शिक्षकांना १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे. त्यानुसार आतापासून पात्र शिक्षकांची चाचपणी सुरू केल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी दिली.यापूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या कार्यकाळात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षांपासून प्रशासक डॉ. आस्तिककुमार पांडेय यांच्या कार्यकाळात कोरोनामुळे शिक्षकांचा गौरव झाला नाही. यंदा मात्र कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच शाळा देखील सुरळीत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्काराकडे पालिका शिक्षकांचे लक्ष लागून आहे. या पार्श्वभूमीवरच शिक्षकदिनी ५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेने १७ शिक्षकांचा गौरव केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी आतापासूनच प्रस्ताव मागवले आहेत. नियुक्त समितीकडून सर्व प्रस्तावांची पडताळणी करून आदर्श शिक्षक निवडले जातील. नंतर त्यास प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांची मंजुरी घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातील, असे संजीव सोनार यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...