आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करार रद्द करण्याची नोटीस:कांचनवाडीमध्ये कचऱ्यातून वीजनिर्मितीचा प्रकल्प मनपा चालवणार : मनपा प्रशासक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कांचनवाडी येथील गॅस, वीजनिर्मिती प्रकल्प चालवण्यासाठी इंदूरच्या बँको एजन्सीला वारंवार नोटीस बजावूनदेखील या एजन्सीने प्रकल्प चालवण्याची तयारी दर्शवली नाही. त्यामुळे मनपाने हा प्रकल्प चालवण्याचा निर्णय घेत बँको एजन्सीला करार रद्द करण्याची नोटीस बजावल्याचे मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

कांचनवाडीत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा ३० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प सुरू झाला. मात्र, त्यातून ना बायोगॅस मिळतो, ना वीज मिळते. तरीदेखील या केंद्रासाठी शहरातील २० मेट्रिक टन ओला कचरा पुरवला जातो. इंदूरच्या बँको सर्व्हिसेसकडून हा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने पाहिजे, त्या पद्धतीने कार्यवाही केली जात नाही. कांचनवाडी केंद्राचे १० लाखांचे वीज बिल थकले आहे. हे बिल बँको सर्व्हिसेसने भरले नसल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी कांचनवाडी केंद्राचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे.

मनपाच्या घनकचरा विभागाने बँको सर्व्हिसेस एजन्सीला आतापर्यंत तीन वेळा नोटिसा बजावल्या आहेत. तरीदेखील बँकोने प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच मनपा प्रशासकांनी बोलावलेल्या बैठकीस बँकोचे प्रतिनिधी हजर राहिले नाहीत. त्यामुळे घनकचरा विभागाने ५ डिसेंबर रोजी एजन्सीला आपल्यासोबत मनपाने केलेला करार का रद्द करू नये, अशी नोटीस बजावली हाेती. त्यानंतर एका महिन्यात डॉ. चौधरी यांच्यासमोर येऊन खुलासा सादर करावा, असेही नोटिसीत म्हटले होते. त्यानुसार २० डिसेंबर रोजी आयुक्तांसमवेत कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

इंदूरच्या बँको एजन्सीला करार रद्दची बजावली नोटीस या बैठकीतही कंपनीच्या प्रतिनिधींनी कांचनवाडी प्रकल्पासंदर्भात आयुक्त डॉ. चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, कांचनवाडीचा बायोगॅस, वीज निर्मिती प्रकल्प महापालिकेने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. इंदूरच्या बँको एजन्सीला करार रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. हा प्रकल्प सुरू करणे अत्यंत गरजेचे असून लवकरच तो चांगल्या पद्धतीने सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...