आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारसा स्थळांचे संवर्धन:वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी मनपा उभारणार स्वतंत्र निधी

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक वास्तू व निसर्गरम्य वारसा स्थळांचे संवर्धन करून पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र निधी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांकडून चाचपणी केली जात असून लवकरच यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरात महिला-२० परिषदेच्या निमित्ताने विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळांबाबतची माहिती जाणून घेतली.

वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्याचा मनोदय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. शहराच्या चोहोबाजूंनी असलेली पर्वतरांग, त्या पर्वतरांगेतील वारसा स्थळांचा चांगल्या पद्धतीने पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास फायदा होईल, असा विचार पुढे आला. त्या दृष्टीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चाचपणी सुरू केली आहे. वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी स्वतंत्रपणे निधी उभारण्याचा विचार यातून पुढे आला आहे.

शहरातील उद्योजक, व्यावसायिक, बिल्डर्स यांच्याकडून वारसा स्थळांचा विकास करून पर्यटन स्थळ तयार करण्यासाठी स्वतंत्रपणे निधी उभारला जाणार आहे. मनपाच्या आगामी बजेटमध्ये वारसा स्थळांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी उभारून या निधीच्या माध्यमातून त्यांचा कायापालट केला जाईल, त्या ठिकाणीही नागरिकांना सोयी, सुविधा उपलब्ध करून देत पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...