आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावर्षीच्या जी-२० जागतिक परिषदेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. याचा एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर ला वुमन जी २० परिषदेचे नियोजन करण्याचा बहुमान मिळाला.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने आपल्या ऐतिहासिक शहराचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोहचविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. त्याचे परिणाम स्वरूप आपले शहर सौंदर्यकरण स्पर्धेत राज्यात अव्वल आले आहे.असे प्रतिपादन प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपा अधिकारी कर्मचारी गौरव सोहळ्यात केले.
शहरात नुकत्याच पार पडलेल्या वुमन जी २० परिषद निम्मित छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व विभागाने आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. रात्रंदिवस शहर सौंदर्यकरण करण्यासाठी अधिकारी कर्मचारी मेहनत घेत होते.या सर्वांचा गौरव करण्यासाठी मा.प्रशासक यांच्या आदेशानुसार सिद्धार्थ जलतरण तलाव परिसर येथे गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जी-२० परिषदेत सोपवण्यात आलेली कामे यशस्वीपणे पार पाडलेल्या विभागप्रमुख,अधिकारी कर्मचारी यांचा मा.प्रशासक यांच्या हस्ते गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासक म्हणाले की,प्रथम आयोजकांना आपल्या शहरात जी 20 होऊ शकेल का ? अशी शंका होती. परंतु प्रशासनाने हे यशस्वी पणे करून दाखविले.याबद्दल आयोजकांनी कौतुक केले, अधिकारी यांची प्रशंसा हीच आमची पावती, याशिवाय नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद,नागरिकांनी आपल्या शहरातील सौंदर्यकरणाचे स्टेटस ठेवले.मनपाच्या प्रत्येक विभागांनी अतिशय मेहनत केली, पेंटिंगचे नियोजन करण्यासाठी सोमनाथ जाधव यांनी परिश्रम घेतले त्यांचे याबद्दल कौतुक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचा शहरात स्वछता ठेवण्यात सिंहाचा वाटा आहे.
उद्यान विभाग, विद्युत विभाग, शहर अभियंता यांचे अभिनंदन.यांनी जलदगतीने कामासोबतच गुणवत्ता टिकवली. यांत्रिकी विभाग, स्मार्ट सिटी, माजी सैनिक, सर्वांनी पुढे येऊन स्वकल्पनेने काम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे नाव गाजले,नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन काम करा व , संस्थेला नेहमी प्राधान्य द्या, आपण काय करू शकतो हे आपण दाखवले.
यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले की, पेंटिंग जपून ठेवावी,स्वछते बाबत नागरिकांनी सतत असेच जागरूक राहावे.यामुळे स्वच्छता बाबत आपले शहर भारत मध्ये टॉप टेन मध्ये आहे.तसेच राज्य शासन शहर सौंदर्यकरण स्पर्धेत अव्वल आहे.यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, रविंद्र निकम, शहर अभियंता ए बी देशमुख, उप आयुक्त सोमनाथ जाधव,अपर्णा थेटे,राहुल सूर्यवंशी,स्मार्ट सिटी उप मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ जोशी , आणि सर्व विभागप्रमुख यांच्या अधिपत्याखालील विभागांचे अधिकारी,स्मार्ट सिटी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.