आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक सत्र:मनपा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांपासून पुस्तके मिळेनात ; 2 हजार मुले घेतात शिक्षण

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा सुरू होऊन ६ महिने उलटले आहेत. आता दिवाळीच्या सुट्या संपून दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाले तरीदेखील मनपा शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत माजी नगरसेवक तथा जनजागरण समितीचे अध्यक्ष मोहसीन अहमद यांनी मनपा प्रशासकांना निवेदन दिले.

शहरात मनपाच्या १७ शाळा आहेत. यातील ५ शाळा उर्दू, तर १२ मराठी माध्यमाच्या आहेत. यात एकूण २ हजार मुले शिकतात. विशेष म्हणजे मनपाच्या मालमत्ता करात २ टक्के रक्कम शिक्षणासाठी खर्च होणार असल्याचे नमूद केले आहे. उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारांनाही आम्ही अर्ज दिल्याचे मोहसीन अहमद यांनी सांगितले. याबाबत मनपाचे शिक्षण अधिकारी संजय सोनार यांना विचारले असता ते म्हणाले, यंदा पुस्तके देण्यास उशीर झाला आहे. काही तांत्रिक कारणामुळे अडचण आली होती. मात्र, आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले नाही. विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके घेऊन देण्यात आली. या आठवड्यात नवीन पुस्तके मिळतील, असे सोनार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...