आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपाने मध्यवर्ती जकात नाक्याजवळ एक पेट्रोल पंप सुरू केला असून आणखी ४ ठिकाणी पंप सुरू केले जाणार आहेत. त्यातील कांचनवाडी येथे पेट्रोल पंप उभारण्यास ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याने एचपीसीएल पेट्रोल पंप उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गरवारे स्टेडियम, हर्सूल आणि चिकलठाणा येथील जागेचा अकृषक परवाना घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. के. पंडित यांनी सांगितले. महापालिकेने उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या दृष्टीने स्वत:चे ५ पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला. याची तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी यंदाच्या अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती. त्यानुसार पहिला पंप जकात नाक्याजवळ उभारला आहे. त्यानंतर प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी ४ पंप सुरू केले जाणार आहे. त्यानुसार जागांची पाहणी केली.
चिकलठाणा परिसरात कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या शेजारी, हर्सूल-सावंगी येथील मनपाच्या टोल नाक्याजवळ पंप सुरू करणार आहे. त्यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीची मदत घेतली जाणार आहे. गरवारे क्रीडा संकुलाजवळदेखील पंप सुरू करणार आहे. या दोन्ही ठिकाणी जागेचा अकृषक परवाना आणि एमआयडीसीची ना हरकत घ्यावी लागणार आहे. कांचनवाडी भागात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. या निवासस्थानांच्या परिसरात पंप सुरू केला जाणार आहे. त्यासाठी निवासस्थाने पाडून जागा मोकळी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.