आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण संख्येत वाढ:कोरोना तपासण्या वाढवण्याची मनपाची तयारी; बैठकीत सूचना

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तपासण्यांची संख्या वाढवा, अशा सूचना वैद्यकीय अधिकारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या बैठकीत देण्यात आल्या. ५ एप्रिल रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी बैठक घेतली. शहरातील सर्व केंद्रांवर टेस्टिंग किट उपलब्ध करून घेणे, टेस्टिंग वाढवणे, सारीसदृश रुग्णांचे कोविड- १९ तपासणी करणे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्यांच्या एचआरसी टेस्टिंग करून घेणे. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सॅम्पल लॅबला पाठवणे आदी सूचना देण्यात आल्या. या वेळी डॉ. बाळकृष्ण राठोडकर, डॉ. प्रेरणा संकलेचा, डॉ. मेघा जोगदंड, आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य केंद्रांचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व कोरोना वॉर रूममधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढले आहे.