आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी:मनपाच्या शाळा दुरुस्तीचे काम ठेकेदारांकडून बंद

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक शाळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे, परंतु ठेकेदारांनी काही कारणांमुळे यातील अनेक शाळांचे काम बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी जागा नाही. याबाबत उपायुक्त नंदा गायकवाड यांच्याकडे तक्रार केल्याचे जनजागरण समितीचे मोहसीन अहमद यांनी सांगितले.

महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत सध्या १२ शाळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु त्यातील अनेक ठेकेदारांनी दुरुस्तीचे काम बंद केले आहे. यात नारेगाव, शहाबाजार, चेलीपुरा, आसेफिया कॉलनी, संजयनगर, बायजीपुरा आदी शाळांचा समावेश आहे. बहुतांश शाळेतील फरशा काढल्या असून भिंतींचे प्लास्टरही काढलेले आहे. ही कामे करण्यापूर्वी प्रशासनाने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. उपायुक्त व शिक्षणाधिकाऱ्यांनी ठेकेदारांना तातडीने काम करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अहमद यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...