आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तास सुरू होता पाणीपुरवठा:मनपाच्या पथकाने फीडर लाइनवरील 9 अनधिकृत नळ कनेक्शन तोडले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या पथकाने कटकट गेट येथून दिल्ली गेट ते हत्तीसिंहपुरा या भागातील फीडर लाइनवरील ९ अनधिकृत नळ कनेक्शन तोडले. पथकाने ही कारवाई १९ डिसेंबर रोजी केली. या कनेक्शनद्वारे २४ तास पाणीपुरवठा होत होता. ही कारवाई पथक क्रमांक २ चे प्रमुख तथा मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता के. एम. फालक, पथक अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता भास्कर काकनाटे, अक्षय डुकळे, मोहंमद शरीफ, तमीज पठाण, वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार, उमेश दाणे आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...