आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचे नियोजन करा:मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरींचे आदेश, पाहणी करून घेतला आढावा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सफारी पार्कमध्ये पिण्याचे पाणी आणि वापराचे पाणी याची उपलब्धता आणि मागणी याचे मूल्यांकन करून अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.मिटमिटा येथे तयार होणाऱ्या प्रस्तावित सफारी पार्कची गुरुवारी प्रशासकांनी पाहणी केली. स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, उपआयुक्त राहुल सूर्यवंशी आणि कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा एम. बी. काझी यांनी सोबत बसून आराखडा तयार करावा, अशी सूचना प्रशासकांनी दिली. सफारी पार्कच्या ठिकाणी एक पाझर तलाव आहे. त्याचे पाणी पार्कमध्ये वापरता येईल तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत या ठिकाणी जास्त क्षमतेची पाण्याची टाकीदेखील प्रस्तावित असल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. चाैधरी यांनी संरक्षण भिंत, पिंजऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सुधारित बार चार्ट सादर करण्याची सूचना पीएमसीला देण्यात आली. या वेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, उपआयुक्त राहुल सूर्यवंशी, उपसंचालक नगररचना ए. बी. देशमुख, स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, अरुण शिंदे, उपअभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी अजय भोय, प्रभारी प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. शाहेद शेख, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...