आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउच्च न्यायालयाने मनपाला शहरातील विविध विद्युत खांबांवर टाकलेल्या केबल्स (ओव्हरहेड केबल्स) काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाने शहरातील लटकलेल्या अनधिकृत वायर काढण्याची मोहीम सोमवारी हाती घेतली आहे. शहरातील झोन क्रमांक ३, ६ आणि ९ या ठिकाणी कारवाई करून १८,४७३ मीटर केबल काढण्यात आली. मुकुंदवाडी, पायलट बाबानगरी ते प्रकाशनगर, प्रकाशनगर ते रामनगर कमान, रामनगर ते विठ्ठलनगर, कामगार कॉलनी ते केंब्रिज शाळेपर्यंत, हॉटेल अमरप्रीत चौक ते क्रांती चौक, क्रांती चौक ते अजबनगर कमान, क्रांती चौक ते सतीश पेट्रोल पंप, अहिल्याबाई होळकर चौक ते हॉटेल पंचवटी, पंचवटी ते रेल्वेस्टेशन, मदनी चौक ते गंजे शहिदा कब्रस्तान, खास गेट ते जिन्सी पोलिस स्टेशन, रेंगटीपुरा ते चंपा चौक, चंपा चौक ते शहाबाजार कमानपर्यंत, शहाबाजार ते चेलीपुरा पोलिस चौकी, श्रीराम मंदिर रोड ते किराडपुरा चौक, सेंट्रल नाका ते एमजीएम या परिसरात ही कारवाई करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.