आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाकडून १ फेब्रुवारी रोजी मिलिंद कॉलेजसमोरील आठ अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने काढण्यात आली. लिटिल फ्लाॅवर शाळा ते लक्ष्मी कॉलनी येथील मोरे चौक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.लिटिल फ्लॉवर हायस्कूलच्या चौकात झुणका-भाकर केंद्र नियमानुसार नोटीस देऊन काढले. हे झुणका-भाकर केंद्र माजी नगरसेवक पुरुषोत्तम ठाकूर यांचे होते. या जागेसंदर्भात न्यायालयाने स्थगिती दिली आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. याबाबत सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याने हे झुणका-भाकर केंद्र काढण्यात आले.
जी-२० निमित्त शहरात जी कारवाई सुरू आहे त्याच कारवाईत हे अतिक्रमणदेखील काढण्यात आले. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या पथकाने प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या वेळी लक्ष्मी कॉलनीलगत असलेल्या मोरे चौक या ठिकाणी एकूण १० बाय १५ आकाराच्या ७ टपऱ्यांचे अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात आले. या वेळी काही कार्यकर्त्यांनी विरोध केला. परंतु, पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये यांनी सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. या भागात दहा टपऱ्यांचे अतिक्रमण काढले. इमारत निरीक्षक सय्यद जमशेद यांचे पथक सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.