आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने एन-८ आणि एन-१ सिडको कॅनॉट परिसरातील अतिक्रमणे हटवली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.एन-८ येथील बजरंग चौकापासून पुढे एन-८ हॉस्पिटल रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण १५ बोर्ड, लोखंडी काउंटर आणि डिजिटल बोर्ड जप्त करण्यात आले. तसेच इतर सर्व रस्त्यांवरील कच्चे-पक्के बांधकाम जेसीबीच्या साह्याने पूर्णपणे तोडून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. तसेच एन-१ सिडको बस स्टँडपासून प्रोझोन मॉल परिसर व एन-१ पोलीस चौकी या भागात १३ हातगाड्या जप्त करण्यात आल्या.
पार्किंगच्या जागेत पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करून अतिक्रमण केल्याने एकूण २८ अतिक्रमणधारकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नुसार ४७८ कलम अंतर्गत २४ तासांची नोटीस देण्यात आली आहे. भारत बाजार आणि कॅनॉट परिसरातील नागरिकांना २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. जनहित याचिकेनुसार ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, सिडकोचे उदय चौधरी, नगर रचना विभागाच्या पूजा भोगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.