आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी मनपाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. जायकवाडीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यासह अधिकचे पाणी मिळावे यासाठी शहरातील विविध भागांतील विहिरी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर नवीन सात टाक्यांतून पाणी साठवण क्षमता वाढवणे, पाणी उपसा गतिमान करण्यासाठी अतिरिक्त पंप बसवणे, मुख्य जलवाहिन्यांवरील बायपास बंद करणे, गारखेडा परिसरात नवीन संप तयार करणे, हातपंपांची दुरुस्ती करून पाणी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
शहराला आता पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे. उन्हाळ्यात परिस्थिती बिघडू नये म्हणून नियोजन करण्यात येत आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. सध्या पुरेशी साठवण क्षमता नाही. तेव्हा नवीन पाणीपुरवठा योजनेतून मार्चअखेर सात जलकुंभ बांधून तयार हाेणार आहेत. यासोबतच गारखेड्यात एक मोठा संप बांधण्यात येत आहे. तो बांधून झाल्यास एक्स्प्रेस लाइनवरील तीन मोठे बायपास बंद केले जातील, जेणेकरून शेवटच्या जलकुंभापर्यंत पूर्ण दाबाने पाणी येऊन जलकुंभ भरतील.
ज्या भागात नळ योजना नाही, तेथे विहिरीचे पाणी
शहरातील ज्या मोठ्या परिसरात नळ योजना पोहोचलेली नाही तेथे वापरासाठी विहिरींचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. त्याकरिता विहिरींवर मोटार बसवून स्टँडपोस्ट उभारले जातील. हातपंपांची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी खासगी एजन्सीची मदत घेतली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.