आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोसकून खून:किरकोळ कारणातून चाकूने भोसकून खून; चौघांवर गुन्हा ; जखमी सुरक्षा रक्षकाचा अखेर मृत्यू

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ कारणातून शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर चाकूहल्ला करत चौघांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नर्सरी कॉलनी, रांजणगाव येथे ४ जून रोजी घडली होती. या घटनेतील जखमी प्रभाकर चोरमले (४९) यांचा ११ जून रोजी उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. अन्य तिघांवर घाटीत उपचार सुरू असून एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रभाकर चोरमले हे पत्नी मनीषा, दोन मुले संकेत व नितीन यांच्यासह नर्सरी कॉलनीतील इस्लाम बेग यांच्या वाड्यात किरायाने राहत. चोरमले अॅडव्हांटेज कंपनीत सिक्युरिटी गार्ड आहेत. याच वाड्यात इतरही भाडेकरू राहतात. वाड्यात पाण्यासाठी सर्वांमध्ये एक सामाईक नळ आहे. त्यावरून सर्व भाडेकरू पाणी घेतात. याच नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून ४ जून रोजी दुपारी ४ वाजता शेजारील भाडेकरू लक्ष्मीबाई भाऊसाहेब दळवीने मनीषाशी वाद घातला होता. पुढे याच कारणावरून लक्ष्मीबाईचा पती भाऊसाहेब दामोदर दळवी, मुलगा योगेश व महेश दळवी या चौघांनी रात्री १० वाजता चोरमले यांना अंगणात उभे राहून शिवीगाळ केली. त्यानंतर योगेश दळवीने वडील, भाऊ व आईच्या मदतीने संकेत व त्याचे वडील प्रभाकर, भाऊ नितीन व आई मनीषा यांच्यावर चाकूने वार करत त्यांना जखमी केले. यात प्रभाकरच्या पोटावर दोन वार केले व डोक्याच्या मागील बाजूस दगड मारल्याने ते जागीच बेशुद्ध होऊन पडले. तेवढ्यावरच न थांबता दळवी कुटुंबीयांनी मनीषाला चाकूने भोसकून जखमी केले. पोलिसांत धाव घेऊन त्यांनी चोरमले कुटुंबावर गुन्हा दाखल केला.

हस्ते खेळते कुटुंब उद्ध्वस्त चोरमले परिवाराची आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तरी त्यावर मात करण्यासाठी वडील सुरक्षा रक्षक म्हणून तर दोन्ही मुले कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. मात्र, या किरकोळ कारणावरून घडलेल्या मोठ्या घटनेत वडील जिवानिशी गेले, तर मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेत सुरुवातीला आरोपी भाऊसाहेब दळवी, योगेश दळवी, महेश दळवी व लक्ष्मीबाई दळवी (सर्व रा. नर्सरी कलनी) यांच्यावर जीवघेणा हल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता गुन्ह्यात वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...