आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:किरकोळ कारणावरून झाला खून, कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपिनवार पुढील तपास करीत आहेत.

वसमत तालुक्यातील वापटी शिवारात एका व्यक्तीचा गावालगत मृतदेह आढळून आल्यानंतर कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अवघ्या अर्ध्यातासात खूनाचा वाचा फोडली. या प्रकरणात पोलिसांनी एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 3 सकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील वापटी शिवारात गावालगत शुक्रवारी ता. 2 रात्रीच्या सुमारास गावालगत पाण्याच्या टाकीजवळ एक मृतदेह असल्याची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळाली होती.

त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, महिला पोलिस उपनिरीक्षक सविता बोधनकर, जमादार गजानन भोपे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी गावात चौकशी केली असता सदर मृतदेह गावातील विकास बाबुराव शिंदे (50) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र घटनास्थळावर कुठलेही पुरावे नसल्यामुळे आरोपीचा शोध लावणे कठीण झाले होते.

मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपिनवार यांनी गावात सखोल चौकशी केली असता मयत विकास यांचे गावातीलच त्यांच्या चुलत भावासोबत वाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी मयत विकास त्यांचा चुलतभाऊ अमोल उर्फ हरिभाऊ लक्ष्मण शिंदे (35) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुलीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

जून्या वादातून लाकडाने विकास यांच्या डोक्यावर व इतर शरीरावर मारहाण केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी एकनाथ बाबुराव शिंदे यांच्या तक्रारीवरून अमोल उर्फ हरिभाऊ लक्ष्मण शिंदे याच्या विरुध्द कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपिनवार पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...