आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रानेच केला मित्राचा खून:दारू पिताना झालेल्या वादनंतर रुमालाने गळा आवळून हत्या; दोघांना 19 जूनपर्यंत कोठडी

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद दारु पिताना झालेल्या वादनंतर मित्राचा रुमालाने गळा आवळ खून करणारे आरोपी सय्यद आमेर ऊर्फ चिरा सय्यद सलीम (21) आणि फिरोज युनूस शेख (27 रा. दोघेही गल्ली नंबर 4, दादा कॉलनी, कैलासनगर) या दोघांना 19 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी दिले.

प्रकरणात मृत युसुफ खान असदउल्लाह खान (16, रा. दादा कॉलनी) याचे वडील असदउल्लाह खान शफीउल्लाह खान (53, रा. दादा कॉलनी) यांनी 11 जून रोजी सकाळी युसुफ खानचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. तपासादरम्यान युसुफ काही युवकांना सोबत गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून 14 जुन रोजी पोलिसांनी सय्यद आमेर आणि फिरोज या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी खाक्या दाखवताच त्‍यांनी गुन्‍ह्याची कबुली दिली. सय्यद आमेर याने सांगितले की, मृत व दोघे आरोपी जाधवमंडी येथील झाडीमध्‍ये दारु पीत बसले होते. त्‍यावेळी फेरोज आणि युसुफ यांच्‍यात कोणत्‍यातरी कारणावरुन वाद झाला. त्‍यानंतर युसुफने रुमालाने फेरोजचा गळा आव‍ळून खून केल्याची सांगितले. प्रकरणात जिन्‍सी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. तपासादरम्यान मयता सोबत अनैसर्गिक कृत्‍य करण्‍याचा प्रयत्‍न झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

दोघा आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी गुन्‍हा करण्‍यामागे आरोपींचा नेमका हेतु काय होता, आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेले वाहन जप्‍त करायचे आहे. मयतासोबत अनैसर्गिक कृत्‍य झाले काय यासाठी आरोपींची वैद्य‍किय तपासणी करायची आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...