आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:शेतकऱ्याच्या डोक्यात लोखंडी अँगलने वार करून 60 वर्षीय शेतकऱ्याचा खून

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चोरीच्या प्रयत्नात खून झाल्याचा पोलिसांचा संशय

कळमनुरी तालुक्यातील झरा शिवारामध्ये शेतातील आखाड्यावर एका शेतकऱ्याचा डोक्यात लोखंडी अँगलने वार करून खून केल्याची घटना रविवारी (ता.६) उघडकीस आली आहे. सोनाजी दत्तराव तडस (६०) असे मयत शेतकऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील झरा शिवारामध्ये सोनाजी तडस यांचे सुमारे सहा ते सात एकर शेत आहे. शेतातील आखाडा उभारणीसाठी बांधकाम केले जात आहे. या शिवाय टीनशेडचे काम केले जात आहे. त्यासाठी लोखंडी अँगल उभे करण्याचे काम सुरू होते. शनिवारी ता. ५ रात्रीच्या वेळी सोनाजी तडस हे शेतात गेले. मात्र सकाळी ते घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या शेताच्या शेजारी असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी आखाड्यावर येऊन पाहिले असता सोनाजी तडस हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.

या घटनेची माहिती त्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना दिली तसेच कळमनुरी पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यातिष देशमुख, कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. व्ही. भोईटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावर सोनाजी तडस यांचा मृतदेह आढळून आला. याशिवाय त्या ठिकाणी असलेले काही लोखंडी रॉड देखील गायब झाल्याचे आढळून आले. त्यामुळे लोखंडी रॉड च्या चोरी करण्याच्या प्रयत्नात चोरट्यांनी तडस यांचा खून केला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मयत सोनाजी तडस यांच्या डोक्यामध्ये लोखंडी अँगल चे पाच घाव असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आता आरोपींचा शोध सुरू केला असून त्यासाठी कळमनुरी पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक काही तयार केले आले. या पथकाकडून झरा शिवारामध्ये तसेच परिसरातील गावांमध्ये माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अद्यापर्यंत कळमनुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला नव्हता. मयत तडस यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser