आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:धारदार शस्त्राने वार करून 65 वर्षीय महिलेचा खून, बदनापूर तालुक्यातील साखरवाडी येथील घटना

बदनापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गळा आवळून, धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना बदनापूर तालुक्यातील साखरवाडी येथे गुरुवारी रात्री उघडकीस आली. सुमनबाई माणिक जिगे (६५, पानशेंद्रा, ता. जालना) असे मृत महिलेचे नाव आहे.

साखरवाडीजवळील एका शेतातील लिंबाच्या झाडाखाली महिलेचा मृतदेह ग्रामस्थांना दिसून आला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता गळ्याला दोरी बांधलेली होती. धारदार शस्त्राने महिलेचा गळा व मानेवर वार करण्यात आले होते. शिवाय, महिलेच्या कमरेला असलेल्या पिशवीतील कागदावर एका व्यक्तीचा मोबाइल क्रमांक दिसून आला. त्यानंतर महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मृत महिलेचा पुतण्या चंद्रकांत जिगे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी खुनाचा गुन्हा दाखल झाला. घटनास्थळाला पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...