आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:अर्ध्या एकर शेतासाठी एकाचा खून, भावासह पुतण्यावर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

वसमत तालुक्यातील सोमठाणा येथे अर्ध्या एकर शेतासाठी एका व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २८ गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात मयताचा भाऊ व पुतण्या दोघांना अटक करण्यात आली आहे. किशन तातेराव जगताप असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील सोमठाणा येथील किशन तातेराव जगताप (४५) व त्यांचा भाऊ गणेश तातेराव जगताप यांच्यात मागील काही दिवसांपासून शेतीचा वाद होता. वडिलोपार्जीत शेतीच्या वाटण्या नंतरही अर्धा एकरचा वाद सुरुच होता. त्यातून त्यांच्यात कुरबुर सुरुच होती तर काह वेळा भांडणेही होत होती.

दरम्यान, मंगळवारी ता. २७ रात्री शेताचा वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी किशन जगताप यांना त्यांचा भाऊ गणेश जगताप व पुतण्या अंकूश गणेश जगताप यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. अर्धा एकर शेत दे असे म्हणत त्यांच्या डोक्यात, छातीत व चेहऱ्यावर दगडाने वार केले. यामध्ये किशन जगताप गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले.

या प्रकरणी डॉ. अतुल जगताप यांच्या तक्रारीवरून वरील दोघांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक वसीम हाश्‍मी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार विलास राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी गणेश जगताप, अंकूश जगताप यांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...