आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

परभणी:सात वर्षीय बालकाचा चुलत आजोबाकडून निर्घृण खून, सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील प्रकार

परभणी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलु तालुकयातील चिकलठाणा येथील एका सात वर्षीय बालकाचा त्याच्या चुलत आजोबाने गळा आवळून व नंतर विळ्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी (दि. 12) दुपारी घडली. अभिराज श्रीराम जाधव असे या बालकाचे नाव असून चुलत आजोबा डिगंबर जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप समजले नाही.

अभिराज हा घरासमोर खेळत होता. त्यावेळी डिगांबर जाधव (वय 56) ने त्याचा अचानक गळा दाबावयास सुरवात केली. अभिराज याच्या आईच्या तो प्रकार निदर्शनास आला. तेव्हा त्या धावून आल्या व डिगांबर जाधव याच्या तावडीतून अभिराज याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु डिगंबर याने त्याच्या हातातील विळ्याने अभिराज याच्या छातीवर व पोटावर वार केले. त्यामुळे गंभीर अवस्थेत अभिराज यास सेलूतील उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी धावपळ करीत दाखल केले. परंतु अभिराज यास वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.

सेलू पोलिसांना घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दिगांबर जाधव यास ताब्यात घेतले. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड हे करीत आहे.