आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी:दोन मित्रांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तिसऱ्या मित्राचाच खून, चाकूने भोसकले; भोकरदन येथील घटना

भोकरदन2 महिन्यांपूर्वीलेखक: महेश देशपांडे
  • कॉपी लिंक
  • पुढील तपास पोलीस निरीक्षक जोगदंड हे करीत आहे.

मित्राचे सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकू भोसकून खून करण्यात आल्याची घटना भोकरदन शहरात घडली असून या घटनेने शहर हादरले आहे. सागर भारत बदर (वय 30 वर्षे ) रा. वालसा खालसा असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांनी भोकरदन पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 5 जुलै गुरुवार रोजी रात्री 10:15 च्या सुमारास योगेश पुंजराम फुके रा.फत्तेपुर याने कैलास फुके यास कॉल करून त्याला फत्तेपुर रोडवरील महावितरण च्या 220kv सबस्टेशन जवळ बोलावून घेतले.

यावेळी कैलास फुके व सागर भारत बदर हे दोघे तेथे गेले असता योगेश फुके व सूर्यभान शेषराव फुके पुलाच्या कठड्यावर बसलेले होते. यावेळी कैलास व योगेश यांच्यात मागील झालेल्या वादावरून भांडण झाले. त्यामुळे सागर बदर हा वाद सोडवण्यासाठी गेला असता योगेश फुके याने आमच्या मध्ये का पडला म्हणत कमरेवरील चाकू काढुन सागर च्या पोटात खुपसला.

यानंतर योगेश आपल्या स्कार्पिओ गाडीने फत्तेपुर च्या दिशेने पळून गेला. दरम्यान कैलास व सूर्यभान यांनी सागरला भोकरदन ग्रामीण रुग्णालय व नंतर जालना येथे उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भोकरदन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोगदंड हे करीत आहे.

संपूर्ण प्रकरण काय?
गजानन फुके (रा. फत्तेपुर) आपला लहान भाऊ सुनीलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भोकरदन-जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता. वाढदिवस साजरा झाल्यानंतर जेवण करण्यापूर्वी कैलासशी जुने वाद असलेल्या योगेश पुंजाजी फुकेने फोन केला. आपल्यातील जुने वाद मिटून टाकू तू फत्तेपुर रोडवरील 132 केव्ही केंद्राजवळ ये, असे सांगत योगेशने कैलासला बोलावून घेतले.

कैलासने सागरला सोबत घेत दुचाकीवरून 220 केव्ही केंद्र गाठले. येथे योगेशसोबत हनुमंत फुके देखील होता. यावेळी कैलास व योगेश यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, सागर व इतरांनी भांडण मिटवले. यानंतर कैलास दुचाकी चालविण्यासाठी बसला, त्याच्यामागे सागर बसण्यासाठी निघाला. याच दरम्यान योगेशने सागरच्या पोटात चाकूने खुपसला. अचानक झालेल्या वारामुळे सागर खाली कोसळला. हे पाहताच योगेशने तेथून पळ काढला.

बातम्या आणखी आहेत...