आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:जुन्या वादातून सुरक्षा रक्षकाचा मिसारवाडीत खून; चौघे अटकेत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आधी बेदम मारहाण केली, नंतर गळा दाबला

जुन्या वादातून मिसारवाडीत सुरक्षा रक्षकाला चौघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर एकाने गळा दाबून त्याचा खून केला. ही घटना सोमवारी (२१ मार्च) रोजी नऊच्या सुमारास घडली. सलीम मुस्तफा शहा (३०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सुनील पारधे, मनोज पारधे, सागर पारधे, प्रभुदास पारधे यांना सिडको पोलिसांनी अटक केली असून, यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसारवाडी येथील सुभेदार रामजीनगर येथे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास सलीम मुस्तफा शहा हा घराच्या ओट्यावर बसलेला असताना जुन्या वादातून सुनील पारधे याच्या सोबत त्याचे भांडण झाले. ही बाब मनोज पारधे, सागर पारधे आणि प्रभुदास पारधे यांना समजल्यावर त्यांनीही सलीम याला मारहाण केली. तसेच सलीमला हे चौघे संघर्ष चौकात घेऊन गेले. त्या ठिकाणी त्याला पुन्हा बेदम मारहाण केली. त्यानंतर सुनील याने सलीमचा गळा दाबला. सलीम बेशुद्ध होऊन पडलेला पाहून त्याचा भाऊ नाझीम शहा याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सलीमला मृत घोषित केले. मृत सलीम हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो विवाहित असून त्याला एक मुलगी आहे.

बातम्या आणखी आहेत...