आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कोठडी:अनैसर्गिक कृत्य उघड होऊ नये म्हणून खून; आरोपीस पोलिस कोठडी

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलाचा रुमालाने गळा आवळून खून केल्या प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. त्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांपैकी एक सय्यद आमेर ऊर्फ चिरा सय्यद सलीम (२१, दादा कॉलनी, कैलासनगर) याने मृत मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्‍य केले. तो त्याच्या घरी आणि परिसरातील लोकांना सांगेल या भीतीपोटी त्याच्याच रुमालाने त्‍याचा गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली. तसेच खून केल्यानंतर मृताच्या मोबाइलमधील सिम कार्ड तेथेच काढून फेकले आणि मोबाइल त्याने स्वत:जवळ ठेवल्याचेदेखील त्याने कबूल केले आहे. दरम्यान, आरोपी सय्यद आमेर ऊर्फ चिरा आणि फेरोज युनूस शेख (२६, रा. गल्ली नं. ४, कैलासनगर) या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. चरडे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...