आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील भारतनगरातील वयोवृद्ध महिला हलिमाबी वजीर शेख (७५) यांचा २ जून रोजी राहत्या घरात उसने पैसे न दिल्याने डाेक्यात मुसळी मारून खून करणाऱ्या आरोपी शेख राजू शेख इसाक (४५, रा. सावखेडा, ता. गंगापूर) यास पोलिसांनी ७२ तासांत अटक केली. याप्रकरणी मृत हलिमाबी यांचा मुलगा शेख शामीर शेख वजीर (४६, रा. जांभळी, ता. पैठण) यांच्या फिर्यादीवरून बिडकीन ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
२ जूनला हलिमाबी जखमी अवस्थेत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी करून जळत असलेली घरातील गादी व इतर साहित्य विझवले. तसेच, हलिमाबी मृत अवस्थेत असल्याचे समजले. घरातील खुर्चीचा एक पाय तुटलेल्या अवस्थेत असल्याने त्या खुर्चीवर बसताना पाय घसरून पडून लोखंडी कपाटावर डोके आदळून गंभीर जखमी होऊन मृत झाल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तवला होता.
पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा मृत्यू संशयास्पद असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व बिडकीन पोलिसांना तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांना खबऱ्यामार्फत शेख राजू शेख इसाकने खून केल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ संशयित शेख राजू शेख इसाकला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गावातील लोकांकडून उसने पैसे घतले असून ते वारंवार पैसे परत करण्याची मागणी करत होते. त्यामुळे हलिमाबी यांच्या घरी येणे-जाणे असल्याने त्यांच्याकडे उसने पैसे मागितले.
परंतु, त्यांनी नकार दिला होता. मात्र, २ जून रोजी सकाळी ३.३० वाजता दुचाकी (एमएच २० ईक्यू २६६७) एका रुग्णालयाच्या परिसरात उभी करून तोंडाला काळा कपडा बांधून घरी जाऊन त्यांना उठवले व अडीच लाखांची मागणी केली. परंतु, त्यांनी नकार दिल्याने अंगावरील दागिने मागताच त्या रागवल्या. त्याचा राग आल्याने घरातील मुसळी त्यांच्या डोक्यात मारून जखमी करत दागिने घेऊन पाेबारा करण्याआधी आग लावली व दुसरे कपडे बदलून दुचाकीवर गेल्याची कबुली दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.