आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्धी’साठी 22 कोटींचा मुरूम चोरला:आमदार हरिभाऊ बागडे यांचा आरोप, हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार प्रश्न

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठवडाभरापूर्वीच उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गासाठी हर्सूल सावंगी येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील सुमारे २२ कोटींचा मुरूम, दगड, माती चोरली, असा आरोप भाजपचे आमदार तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनात या विषयावर तारांकित प्रश्न उपस्थित केल्याची माहितीही त्यांनी दिली.

गौण खनिज चोरीचा तपशील देताना बागडे म्हणाले की, देवगिरी साखर कारखान्याने गट क्रमांक ४१ ते ४७ आणि ५४ मध्ये ५४ हेक्टर जमीन घेतली होती. त्यातील २० एकर समृद्धीसाठी संपादित झाली. त्याचे २७ कोटी रुपये कारखान्याला मिळाले. सप्टेंबर २०२१ मध्ये आम्ही केलेल्या पाहणीत असे लक्षात आले की, २० एकरपेक्षा अधिक जमीन खोदण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. मात्र, पुढे त्याबद्दल कोणतीही कारवाई झाली नाही. कारखान्याची सुमारे ९० एकर जमीन उद्ध्वस्त झाली आहे. हे लक्षात घेता मुरुमाचा मोबदला मिळाला पाहिजे. बागडे यांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केल्याने तत्पूर्वीच त्यांच्याशी वाटाघाटी, चर्चा करून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...