आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:माझ्या 126 वर्षे वयाचे रहस्य- रोज योगा, तेल-मीठ नसलेला आहार, जागतिक आरोग्यदिनी पद्मश्री स्वामी शिवानंदांकडून जाणून घेऊया कसे जगावे निरोगी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी शिवानंद ही ३ आसने रोज करतात...
सर्वांगासन : थायराॅइड होणार नाही. ज्यांना आहे, दूर होईल.
पवनमुक्तासन : पोटाचे विकार दूर होतात. गॅसेस होत नाहीत.
वज्रासन : जेवणानंतर हे

आसन केल्याने अन्न सहजपणे पचते. हवामान कसेही असो, केवळ एक धोतर घालतात. जीवनमंत्र : नो डिझायर, नो डिसीज, नो डिप्रेशन.

रोज रात्री ९ वाजता झोपतात, पहाटे ३ वाजता त्यांची दिनचर्या सुरू होते, दुपारी कधीच झोपत नाहीत १२६ हा माझ्यासाठी केवळ एक नंबर आहे. आजही पूर्णपणे फिट आहे. शरीराला कोणताच आजार नाही. कधी आजारी पडलो नाही. किशोरावस्थेपासून योगासने करत आहे. योगा केल्याने अनिद्रा आणि तणाव पळून जातो. प्राणायाम केल्याने औषध घेण्याची गरज नाही. औषध तुमचे शरीर नष्ट करतात. तरुणांना योगाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. शरीर नेहमी साथ देईल. मी रोज पहाटे ३ वाजता उठतो. थंड पाण्याने डोळे धुतो. हवामानानुसार थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ करतो. एक तास वॉक करत गुरूंकडून मिळालेल्या मंत्राचा जप करतो. त्यानंतर एक तास योगासने करतो. यात सर्वांगासन, पवनमुक्तासन, अर्धचंद्रासन, फ्री हँड, डोळे व मानेच्या व्यायामाचा समावेश आहे. यानंतर चंडी पाठ, दुर्गा पाठ, रामायण आणि महाभारताचे पठण करतो. दुपारी १ वाजता जेवण करतो. यात तेल-मीठ नसलेली उकडलेली भाजी व डाळ असते. मी कधीच दिवसा झोपलो नाही. सायंकाळी रोज ८ वाजता अंघोळ करतो. जेवणात बार्लीची लापशी, बटाटा खवणी आणि उकडलेल्या भाज्या खाऊन रात्री ९ वाजता झोपतो. मी स्वत:ची कामे स्वत:च करतो. भांडी, कपडे स्वत: धुतो. आपल्या खोलीची सफाई स्वत: करतो. शाळेत जाऊ शकलो नाही. मात्र, हिंदी, इंग्रजी आणि बंगाली भाषा बोलता येते.

वाराणसीत राहणाऱ्या १२६ वर्षांच्या स्वामी शिवानंदांना नुकतेच राष्ट्रपतींनी पद्मश्रीने सन्मानित केले. या वेळी त्यांची चपळता पाहून सर्व चकित झाले होते. या वयातही स्वामीजी कसे स्वत:ला निरोगी ठेवतात, याची सर्वांना उत्सुकता होती. जागतिक आरोग्यदिनी बाल ब्रह्मचारी स्वामी शिवानंदांनी दिव्य मराठीला सांगितले, ते या वयातही कसे फिट आहेत. कसे योग व प्राणायामाने प्रेरणादायी जीवन जगताहेत..

बातम्या आणखी आहेत...