आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिद्याचे सर्व खाते भाजपकडे:सरकामधील माझे 40 भाऊ उपाशी; एकनाथ शिंदे नावापुरते मुख्यमंत्री; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंची टीका

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सद्या महाराष्ट्राचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ नावालाच मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची पोझिशन असली तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सर्व पॉवर आहे.शिंदे गटाकडे केवळ रोष निर्माण करणारी खाती असून भाजपकडे मात्र मलिदा असणारी खाती आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. माझे सर्व 40 भाऊ उपाशी आहेत, त्यांना केवळ त्यांची सत्ता आल्याचा भ्रम झालाय, असा टोलाही अंधारे यांनी लगावला. अंधारे यांची टीव्ही सेंटर येथे आज संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने महाप्रबोधन यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त सुभाष अंधारे औरंगाबादेत आलेल्या आहेत. त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला.पत्रकार परिषदेला पक्षाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे आदी उपस्थित होते.

सरकार कुठल्याच प्रकरणात गंभीर नाही

अंधारे म्हणाल्या, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु आतापर्यंत या सरकारने जनतेसाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. उथळ आणि तात्कालिक मुद्यांवर हे सरकार बोलत आहे. राज्यात बेरोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या यासारखे अनेक प्रश्न आहेत. पण कोणत्याच विषयावर हे सरकार गंभीर नाही. मुख्यमंत्री शिंदे हे नावापुरतेच मुख्यमंत्री आहेत. कारण वित्त, गृह यासह सर्व महत्वाची खाती फडणवीस आणि भाजपकडे आहेत. महाप्रबोधन यात्रेतून आम्ही काही प्रश्न विचारत आहोत. त्याचीही योग्य उत्तरे मिळत नाही, असेही अंधारे यांनी सांगितले.

कशासाठी केला अट्टाहास ?

शिवसेनेपासून वेगळे होण्याची वेगवेगळी कारणे शिंदे गटातील आमदार देत आहेत. त्यात हिंदूत्व, निधी न मिळणे, महाराष्ट्राची अस्मिता जपणे, शिवसेना वाचविणे आदी कारणांचा समावेश आहे. परंतु ही सगळी कारण तकलादू आहेत. मुद्दा सत्तेचा होता. पण आताही भाजपसोबत जाऊन यांना काय मिळाले तर काहीच नाही. मग कशासाठी केला होता अट्टाहास असे त्यांना विचारावेसे वाटते असेही अंधारे म्हणाल्या. यावेळी संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्या मतदासंघातल्या विकास कामांच्या बाबत त्यांनी टीका केली.

बातम्या आणखी आहेत...