आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहंकार बाजूला ठेवावा:माझे बॉस राज्यपाल कोश्यारी, मागासवर्गीय आयोग नव्हे : कुलगुरू

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मागासवर्गीय घटकांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. कंत्राटी प्राध्यापक, सीएचबीवर शिक्षक नियुक्त करतानाही सामाजिक आरक्षण पाळले आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने स्वत:चा अहंकार बाजूला ठेवून विद्यापीठात यावे. माझे बॉस राज्यपाल आहेत, आयोगाचे सदस्य नाहीत, अशी सणसणीत चपराक कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी लगावली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयोगाच्या अध्यक्षांना सदस्यांची लेखी तक्रार केली आहे. कुलगुरूंनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला.

आयोगाचे चार सदस्य आणि एक कक्षाधिकारी आरक्षणाच्या संदर्भात पडताळणीसाठी ३१ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता विद्यापीठात आले होते. त्या वेळी कुलगुरू विद्यापीठात नव्हते. नियोजित कामासाठी ते मुंबईत होते. परंतु विद्यापीठाने सदस्यांचे यथोचित स्वागत केले. बैठकीची तयारी केली. पण आयोगातील सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने माध्यमांकडे भूमिका मांडली होती. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्यासह विशेष कक्षाचे उपकुलसचिव विजय मोरे, सहायक कुलसचिव कृष्णा दाभाडे, कक्षाधिकारी सतीश दवणे आदींनी त्यांचे आदरातिथ्य केले. आयोगाच्या सदस्यांना आवश्यक सर्व माहिती, दस्तऐवज उपलब्ध करून दिले होते तरीही केवळ अहंकार म्हणून त्यांनी बदनामी केली आहे. त्यांनी माहितीचे काहीच अवलोकन केले नाही. आयोगाच्या बैठकीचा उद्देश आरक्षण धोरण आढावा घेण्याचा असला तरीही सदस्यांनी त्यास महत्त्व न देता हेतुत: विद्यापीठाची बदनामी केली आहे. मी कुलगुरू आहे.

यापूर्वीच्या आयोगाचा सदस्य होतो कायद्याने माझे बॉस महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. आयोगाच्या सदस्यांचे अधिकार मर्यादित असतात. ते काही माझे बॉस नाहीत. मी स्वत: यापूर्वीच्या आयोगाचा सदस्य होतो. मला आयोगाची कामकाजाची पद्धत व नियम माहिती आहेत. त्यामुळे आपण राज्यपाल, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्याकडे या सदस्यांची तक्रार करत असल्याचेही कुलगुरूंनी पत्रकारांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...