आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाव्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम:‘माय एफएम का सिक्सर’ बॉक्स क्रिकेट लीगला 17 पासून प्रारंभ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माय एफएमचा १२ डिसेंबर रोजी वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त माय एफएम आणि अरिहंत होंडा यांच्या संयुक्त विद्यमाने “माय एफएम का सिक्सर’ सिक्स अ साइड बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन १७ आणि १८ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. महावीर ज्वेलर्स, एल.जी. इलेक्ट्रॉनिक्स, पर्ल एज्युकेशन, राजदरबार मेन्स वेअर, साई न्यूरोसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, संकल्प स्पोर्ट‌्स क्लब, आणि आउटडोअर पार्टनर मीडिया हाऊस या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

बॉक्स क्रिकेट लीगमध्ये १६ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघात सहा खेळाडू असतील. प्रत्येक सामना सहा षटकांचा असणार आहे. विजेत्या संघाला ५१ हजारांचे रोख बक्षीस तर मॅन ऑफ द सिरीज, बॉलर ऑफ द सिरीज आणि बॅट्समन ऑफ द सिरीजला प्रत्येकी ५ हजारांचे रोख बक्षीस जिंकण्याची संधी आहे. स्पर्धा संकल्प स्पोर्ट‌्स क्लब पिसादेवी बीके मार्केटजवळ होणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणी करावी. प्रथम नोंदणी करणाऱ्या १६ संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. ६ संघांची नोंद झाली आहे. नोंदणीसाठी ९४.३ माय एफएम कार्यालय, काकडे टाॅवर, पहिला मजला दर्गा रोड येथे प्रत्यक्ष किंवा ७८७५९४३९४३ क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...