आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:माय एफएमच्या मूषक मेसेंजर उपक्रमाने जिंकली भक्तांची मने

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भक्तांना गणेशोत्सवात लाडक्या बाप्पांची वाट असते तशीच वाट त्यांना ९४.३ माय एफएमच्या मूषकाची असते. कारण माय एफएम कृत्रिम मूषकाची प्रतिकृती करून त्याच्या कानात भक्तांची इच्छा रेकॉर्ड करून ती अष्टविनायकमधील त्यांच्या आवडीच्या बाप्पांना ऐकवतात. या गणेशोत्सवात ९४.३ माय एफएम, नवनीत प्रकाशनतर्फे “माय मूषक मेसेंजर सीझन- २’ झाले. यासाठी गजकेसरी स्टील जालना प्रायोजक तर एलजी इंडिया, पीएनजी ज्वेलर्स काल्डा कॉर्नर, अॅथर इलेक्ट्रिक स्कूटर, रंगोली कलेक्शन, बजाजचे बेबी अँड ब्यूटी स्टोअर्स, कॅनरा बँक सहप्रायोजक होते.

या उपक्रमात भाग घेण्यासाठी विविध सोसायट्यांमध्ये रजिस्ट्रेशन ठेवले होते. गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून उपक्रमाला माय एफएमच्या टीमने सुरुवात केली. चिंचबन कॉलनी, स्काय सिटी, एन-८, मिलेनियम पार्क सोसायटी, द्वारकादासनगर, सेव्हन हिल्स गार्डन, कामाक्षी घरकुल, अथर्व रॉयल सोसायटी, म्हाडा कॉलनी, पोलिस आयुक्तालय सोसायटी, दिशानगरी आदी भागात आरजे प्रेषित, आरजे आकांक्षा, आरजे रसिकासोबत एक्सिक्युटिव्ह प्रोड्युसर अक्षय कांबळे आणि प्रसिद्धिप्रमुख प्रेम निमजे यांनी भेट दिली. त्या ठिकाणी डान्सिंग-सिंगिंग, संगीत खुर्ची, मूषक की पूंछ अशा विविध स्पर्धा व गप्पागोष्टी रंगल्या. सहभागींना पीएनजीकडून गणपती असलेले २४ कॅरेट गोल्ड प्लेटेड पिंपळाचे पान, रंगोली कलेक्शनतर्फे फॅन्सी साडी बक्षिसे दिली. भक्तांनी मूषकाच्या कानात इच्छा रेकॉर्ड केली. ती आरजे प्रेषित अष्टविनायकमधील बाप्पांपर्यंत पोहोचवत आहे.

बातम्या आणखी आहेत...