आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

94.3 माय एफएम:माय एफएमच्या पुलवणूक विशेष ग्रंथप्रदर्शन 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू ; साकेत बुकवर्ल्डतर्फे आयोजन

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपाडे यांच्या १०३ व्या जन्मदिनानिमित्त माय एफएमतर्फे श्रोत्यांसाठी पुलवणूक सीझन-२ उपक्रम राबवण्यात आला आहे. याअंतर्गत विविध कार्यक्रमांसह पुलवणूक विशेष ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी औरंगपुरा, बलवंत वाचनालयाशेजारील साकेत बुकवर्ल्डमध्ये प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची उपस्थिती होती. हे प्रदर्शन १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन ९४.३ माय एफएमतर्फे करण्यात आले आहे. पुलवणूक सीझन-२ मध्ये श्रोत्यांना पु. ल. देशपाडे यांच्या गोष्टी, किस्से, त्यांच्या घरच्या आठवणी, मराठी सेलिब्रेटींच्या मुलाखतीही ऐकता येणार आहेत. माय एफएम आरजेंच्या सोशल मीडिया पेजेसवर पुस्तकांचे वाचनही बघायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...