आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:माय एफएमच्या आरजे कार्तिक, अर्चना यांनी लुटला दुबई ट्रीपचा आनंद

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माय एफएमचे आरजे कार्तिक आणि अर्चना यांनी दुबई ट्रीपचा आनंद लुटला. चाहत्यांच्या लिसनर्सच्या पसंतीवरून त्यांनी दुबईला जायचे ठरवले. कार्तिक म्हणतो, “हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे होते.’ तर अर्चना म्हणाली, “मी दुबईबद्दल जे ऐकले होते त्यापेक्षाही दुबई कितीतरी पटीने सुंदर आहे’. इतके साहस, एवढा आनंद, एवढी मजा, एवढी मस्ती, चविष्ट जेवण आणि भरपूर शॉपिंग या दोघांनी आयुष्यात कधीच केली नव्हती जेवढी त्यांनी या ट्रीपमध्ये केली. या सहलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रीप केवळ एफएम ऐकणाऱ्या लिसनर्सनीच एन्जॉय केली असे नाही, तर या दोन्ही आरजेंना फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटरवर फॉलो करणाऱ्या फॉलोअर्सनीही सुद्धा केली. दुबईचे पहिले डेस्टिनेशन हॉटेल पॅरामाउंट होते. आरजेंनी त्यांच्या रूमच्या बाल्कनीतून बुर्ज खलिफा पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. स्की दुबईचा अॅडव्हेंचर असो किंवा द मॉल ऑफ एमिरेट्समधील खरेदी, दोन्ही क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय होते. मोशन गेटमध्ये दोन्ही आरजेनी थीम पार्कची मजा लुटली.

बातम्या आणखी आहेत...