आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभरातील वैज्ञानिक सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची लस शोधत आहेत. पण तोपर्यंत या विषाणूसोबत आपल्याला लढाव लागणार आहे. आपली सुरक्षितात आणि आपल्यास आपल्या घरातल्यांची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. पण ही काळजी छोट्या छोट्या गोष्टीतून कशी घेता येईल. महागड्या साधणांचा वापर न करता आपल्याचा घरातील साधणांचा वापर कसा करावा. यासाठी खास लाडसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी मिशन बिगिन अगेन अंतर्गत माझी शाळा माझी जबाबदारी अन मीच माझा रक्षक असा संकल्प केला आहे. यासाठी खास शिक्षकांनी दिलेल्या ऑनलाइन प्रशिक्षणाच्या आधारे मुलांनी घरीच हॅण्डवॉश, सॅनिटायझर आणि कापडी मास्क तयार करण्यास सुरुवात केली आहे.
परीक्षा न घेताच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळांना सुट्या देण्यात आल्या. काही शाळांमध्ये विद्यार्थी नुकसान होवू नये यासाठी ऑनलाइन शिक्षणही सुरु आहे. मात्र आपल्या वर्गमित्रांसाबेत शाळेत बसण्याचा बाईंना समोर शिकवतांना पाहण्याचा आनंद आणि मज्जा ही खरं तर वर्गातच येते. परंतु यंदा शाळांचे नवे शैक्षणिक सत्र हे ऑगस्टमध्ये सुरु होईल असे म्हटले जात आहे. मात्र शाळा सुरु झाल्यावरही विद्यार्थी सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे मुख्याध्यापक जी.पी.नजन आणि राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका सारिका जैन यांनी झुम अॅपच्या माध्यमातून पन्नास विद्यार्थ्यांना कडू निम्ब, कोरपड, साबणाचे पाणी, ग्लिसरिन, हळद याचा गरम पाण्यात वापर करुन सॅनिटायझर आणि हॅण्ड वॉश कसे करावे याचे प्रशिक्षण रोज एक तास देत आहेत. याचा फायदा पालकांनी देखील घेतला असून, पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह घेतला. ग्रामीण भागातील पालक जास्त खर्च करु शकत नाही. तसेच माहिती आणि जनजागृतीचा अभाव असल्याने हा उपक्रम शाळा सुरु होण्यापूर्वीच करण्यात येत असल्याचे जैन यांनी सांगितले.
ग्रामीण भागात सर्व काही विकत घेणे शक्य नाही. तसेच लोक शेतीकाम, मजूरी यात पालक व्यस्त असतात. त्यामुळे सुरुवातीलाच आम्ही मुलांना हॅण्डवॉश करणे, सॅनिटायझरचा वापर का करावा, कोरोना विषयीची माहिती, आयसोलेशन, क्वॉरंटाइन याची माहिती दिली. घरीच हॅण्डवॉश तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.सारिका जैन शिक्षिका
कापडी मास्क बँक -
शाळा सुरु झाल्यानंतर सगळ्या मुलांकडे मास्क असतीलच असे नाही.त्यासाठी शाळेत एक मास्क बँक तयार केली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळा उघडल्यावर मास्क ची उपलब्धता व्हावी यासाठी शाळेला मास्त दान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्यांना घरीच मास्क तयार करणे शक्य आहे. अशांनी घरात असलेला स्वच्छ पांढरा कॉटनचा कपडा अथवा रुमाल याला स्वच्छ धुवूण वापरावा. तसेच घरात असलेले कपड्यापासूनही हाताने शिवणू देखील मास्क तयार करता येवू शकते याची देखील माहिती दिली आहे. मुलं आत्मविश्वासाने शाळेत यावीत, सुरक्षेसाठी इतरांवर नव्हे तर आत्मनिर्भर व्हावे हा यामागचा उद्देश आहे असे डी.एल.गुंजाळ यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.