आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकलठाणा विमानतळावर घूसखोरी:विमानतळाच्या भिंतीवरून उडी मारून अवैध घूसखोरी करणाऱ्याला सीआयएसएफने पकडले

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकलठाणा विमानतळाच्या भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश करण्याच्या प्रयत्नातील व्यक्तीला केंद्रीय आौद्याोगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी बुधवारी (8 जून) पकडले.

चिकलठाणा रेल्वेस्टेशन असलेल्या विमानतळाच्या दक्षिण पूर्वेकडील बाजुने आत घुसण्याचा प्रयत्न केला. विमानतळावरील टॉवर क्रमांक 6 च्या जवळ असलेल्या क्रमांक 3 च्या गेटजवळील भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सीआयएसएफच्या जवानांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी तात्काळ कारवाई करीत त्यास पकडले.

जवानांनी संशयिताची विचारपूस केली असता मध्यप्रदेशातील पुतला (जि. खरगोन) येथील संशयित रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले. घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव रवींद्र राधेशाम गोलकर (गबरू) असे आहे. चिकलठाणा येथे आपल्या परिवारासह राहत असल्याचे चौकशीत आढळून आले. परिसरात मजुरी करून तो स्वतःचा आणि कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो हेही चौकशीत निष्पन्न झाले. त्याच्याजवळ कुठलेच ओळखपत्र नव्हते. सीआयएसएफच्या वतीने एअरक्राफ्ट कायदा 1037 नियम 90 (20 (ए) नुसार प्रकरण दाखल करून घेण्यात आले आहे. पुढील कायदेशिर कारवाईसाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याला सुपुर्द करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...