आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व औरंगाबाद चेस आकादमीतर्फे आयोजित 9 वर्षातील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये नागपूरची वेदिका पाल तर मुलांमध्ये पुण्याचा आदित्य जोशीने विजेतेपद पटाकावले.
औरंगाबादची भूमिका वाघले व मुंबईचा अर्जुन प्रभू यांनी उपविजेतेपद मिळवले. कलश मंगल कार्यालय येथे झालेल्या स्पर्धेत राज्यभरातून एकूण 100 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेतील पहिल्या दहा खेळाडूंना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण निवृत्त पोलिस दौलतराव मोरे, विजयसिंह जाधव, राज्य बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव हेमेंन्द्र पटेल, औरंगाबाद चेस अकादमीचे अमरीश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत पंच प्रवीण ठाकरे, अमरिश जोशी, पुष्कर डोंगरे, प्रीती मुंदंडा, केतन अवलगावकर, सुधीर सिंगेवार यांनी काम पाहिले.
औरंगाबादच्या भूमिकाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
स्पर्धेतील पहिल्या दोन मुला-मुलींची छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली. या यजमान औरंगाबादच्या भूमिका वाघलेने उत्कृष्ट कामगिरी करत राज्य संघात स्थान मिळवले. तसेच वेदिका पाल, पुण्याचा आदित्य जोशी व मुंबईच्या अर्जुन प्रभू देखील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल.
स्पर्धेतील अव्वल 10 खेळाडू
आदित्य जोशी (पुणे), अर्जुन प्रभू (मुंबई), निरवान निरव शहा (मुंबई), सहजवीर सिंघ मरास (नागपूर), गौरंग भंडारी (मुंबई), रियार्थ पोद्दार (कोल्हापूर), विहान अनुपम अग्रवाल (मुंबई), अविरत चव्हाण (पुणे), कुशाग्र पालीवाल (नागपुर).
मुली - वेदिका पाल (नागपुर), भूमिका वाघले (औरंगाबाद), प्रांजल राऊत (पुणे), सान्विस दत्तात्रय गोरे (सोलापूर), अन्वी हिरडे (नागपूर), साची चिलकनवार (मुंबई), दिव्या गौरीशंकर (मुंबई), परिमल गांधी (बुलढाणा), भक्ती गवळी (औरंगाबाद), विश्वजा देशमुख (नागपुर).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.