आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सव:नागराज मंजुळे करणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक चित्रपटांची कवाडे खुली करणाऱ्या आठव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला बुधवारी (११ जानेवारी) प्रोझोन माॅलमध्ये सुुरुवात होणार आहे. उद्घाटनाला ख्यातनाम दिग्दर्शक नागराज मंजुळे तर समारोपाला जी-२० परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष संध्या पुरेचा येणार आहेत. पाच दिवसांत पाच स्क्रीनवर ५५ चित्रपट पाहण्याची संधी महोत्सवातून मिळणार आहे.

महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, महोत्सवाचे अध्यक्ष अशोक राणे, एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ज्ञानेश झोटिंग, नीलेश राऊत उपस्थित होते.फक्त कॅटलॉग शुल्काची आकारणी : चित्रपट महोत्सव हा निशुल्क आहे. इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्ट मंत्रालयाच्या वतीने चित्रपट महोत्सवांचे कॅटलॉग शुल्क निर्धारित करण्यात आले आहे यानुसार कॅटलॉगचे शुल्क आकारले जाते, असे निलेश राऊत म्हणाले.

औरंगाबादकरांना जगाशी कनेक्ट करणारा हा महोत्सव आहे. कोविडमुळे दोन वर्षे खंड पडला असला तरीही महोत्सवाची नोंद राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर घेतली गेली आहे, ही बाब दिलासा देणारी आहे.कुलकर्णी म्हणाले, यामध्ये फ्रान्स, नेपाळ, बांगलादेश, पोर्तुगीज, कझाकिस्तान, मोराेक्को, कोरिया अशा विविध देशांतील चित्रपट पाहता येतील. यातून संस्कृती आणि विचारधारेचे आदानप्रदान होते.

बातम्या आणखी आहेत...