आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 स्थळांची यादी प्रसिद्ध:नहर-ए-अंबरी अन् पाणचक्की जल वारसा वास्तूत समाविष्ट

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर नियोजनाचा अद्भुत नमुना व अभिमानास्पद पुरातन वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील नहर-ए-अंबरी आणि नहर-ए-पाणचक्की या दोन वास्तूंचा समावेश केंद्र सरकारच्या जल वारसा विषयक एेतिहासिक वास्तूंच्या यादीत केला आहे. जल शक्ती मंत्रालयाने देशातील ७५ जल वारसा विषय एेतिहासिक वास्तुंची यादी प्रसिद्ध केली. शहरातील नहर व पाणचक्की यांचा त्यात झालेला समावेश वारसा स्थळे व पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादच्या शिरपेचात अभिमानाचे मोरपंख ठरले आहे.

मुघल आणि निजामी स्थापत्याने नटलेल्या औरंगाबादेत १७ व्या शकतात नहरींद्वारे पाणी आणण्याची मलिक अंबर यांनी उभारलेली रचना जल वास्तु रचनेतील आश्चर्याचा व आदर्शाचा नमुना म्हणून ओळखला जातो. नहर-ए-अंबरीनंतर शहरात आणि परिसरात एकूण १३ नहरींची उभारणी करण्यात आली. यात प्रसिद्ध पाणचक्की आणि थत्ते नहर आजही सुस्थितीत पाहायला मिळतात. इतरही काही नहरींना अजून पाणी आहे. आता स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे करत असताना प्रशासनाने शहराचे ऐतिहासिक मूल्य जपण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. सतराव्या शतकातील या नहर ए अंबरी ला पुनरुज्जीवित केल्यास शहराचा पाणी प्रश्न तर सुटेलच पण एक वेगळ्या पद्धतीच्या अभियांत्रिकी प्रणालीचे दर्शन आपण जगाला घडवू शकतो असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

त्यासाठी नहरीची व गोमुखाची दुरुस्ती करून तिथेच माहिती फलकांची उभारणी करण्याची मागणी केली जाते. सुमारे चारशे वर्षांचा वारसा असलेल्या या नहरींच्या संवर्धनाला या निर्णयाने वेगळे स्थान मिळाले आहे. सध्याचे जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या चमूने २०२१ मध्ये नमामि गंगे प्रकल्पाचे महासंचालक राजीव रंजन मिश्रा यांची भेट घेऊन नहरी आणि खाम नदीच्या संवर्धनाबाबत माहिती दिली होती. विद्यमान आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनीही याबाबत पाठपुरावा केला होता. यामुळे केंद्राने नहरींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...