आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:नायब तहसीलदारांचे 4800 रुपये ग्रेड पेसाठी ‘काम बंद’ आंदोलन

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

४८०० रुपये ग्रेड पे द्यावा या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३ एप्रिलपासून नायब तहसीलदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली. नाशिक येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने या आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे. संघटनेेचे विभागीय संघटक विजय चव्हाण, महेंद्र गिरगे, प्रवीण पांडे, उद्धव नाईक तसेच सुवर्णा पवार आदींच्या नेतृत्वात धरणे आंदोलन, निदर्शने झाल्यावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना निवेदन देण्यात आले.