आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य:नामदेवराव चापे, शिवाजी वाठोरे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल अजीज एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीतर्फे सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे आणि कवी तथा साहित्यिक प्रा. शिवाजी वाठोरे यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. व्यापारी मंडळाचे माजी अध्यक्ष राधेश्याम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवा योजना विभागाचे माजी संचालक डॉ. टी. आर. पाटील, प्राचार्य सुनील वाकेकर, चंदा वाठोरे आदींची उपस्थिती होती.या वेळी डॉ. प्रमोद शर्मा म्हणाले, पुरस्काराने माणसात जशी जबाबदारीची जाणीव निर्माण होते तशीच सकारात्मक प्रेरणा निर्माण होते. ४१ शिक्षकांनाही आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मौलाना मोहंमद शहेजाद यांनी प्रास्ताविक केले.

बातम्या आणखी आहेत...