आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींना निवेदन:“विमानतळाला शहीद टिपू सुलतान यांचे नाव द्या : सफाई मजदूर काँग्रेस

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथील विमानतळाला शहीद टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी सफाई मजदूर काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की, १८ व्या शतकात टिपू सुलतान यांनी इंग्रजांना शरण न जाता देशाचे रक्षण केले. इंग्रजांशी युद्ध करताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांनाही क्रूरपणे ठार करण्यात आले. त्यांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. याचे स्मरण ठेवत शहरातील शहीद टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान पटेल यांनी निवेदनाद्वारे केली.

बातम्या आणखी आहेत...