आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चांना उधान:महाविकास आघाडीच्या सभेला नानांची अनुपस्थिती; तब्येत बरी नसल्याने चव्हाण, थोरात राहणार उपस्थित

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर थोड्याच वेळात महाविकास आघाडीची जंगी सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे.

नाना पटोलेंची अनुपस्थिती

महाविकास आघाडीच्या या 'वज्रमुठ' सभेला महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच अनुपस्थित राहणार असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. मात्र, नाना पटोले यांची तब्येत बरी नसल्याने ते या सभेला उपस्थित राहणार नाही, असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सभेसाठी मविआची जय्यत तयारी

आजच्या या सभेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी केली जात असतानाच शहरातील किराडपुरा भागात घडलेल्या घटनेमुळे सभेला सशर्त परवानगी दिली आहे. आजच्या या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित असणार आहे.

दरम्यान, या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नेते सत्ताधाऱ्यांवर काय बोलणार? तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही बोलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.