आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पटोलेंचे दावा:भारत जोडो यात्रेला सर्वाधिक प्रतिसाद महाराष्ट्रात मिळणार; पराभवाच्या भीतीमुळेच भाजप निवडणुका टाळत आहे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांच्या भारत तामिळनाडूपासून ते कर्नाटक आणि तेलंगणापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मात्र महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला देशात सर्वाधिक प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्साह असल्याचे पटोले यांनी सांगितले तसेच भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केवळ पराभवाच्या जास्तीमुळे घेत नसल्याचा आरोप पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषद मध्ये केला.

यांची प्रमुख उपस्थिती

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सात तारखेपासून नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरपासून सुरुवात होत आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुभेच्छामगृहावर पत्रकार परिषद घेतली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, युसुफ शेख, सरचिटणीस नामदेव पवार, अनिल पटेल यांची उपस्थिती होती.

फडणवीसांनी माफी मागावी

नाना पटोले यांनी मनोहर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत जोरदार टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे. लोकशाहीच्या चौथा आधार स्तंभाला अशा पद्धतीने वागणूक देणे चुकीचे असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. पत्रकार हे निर्भीडपणे बातम्या देण्याचे काम करत असतात. मात्र, आपल्या विरोधात कोणी लिहिले तर त्यांना दाबण्याचा हा प्रकार असल्याचं पटोले यांनी सांगितले.

लक्ष वळवण्यासाठी भांडण

आमदारांचे भांडण मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी पटवले यांनी सांगितले की, राज्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी आमदारांचे भांडण लावून प्रश्नापासून दुर्लक्ष करण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका पटोले यांनी केली. राज्यात मोठ्या प्रमाणात प्रश्न असताना राज्यातील उद्योग इतर राज्यात जात असताना त्यापासून लक्ष वळवण्यासाठी अशा पद्धतीने भांडण लावून लक्ष वळवले जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...