आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:न्यूट्रल कार उतरली कॅनॉलच्या पाण्यात; महामार्ग पोलिसांमुळे वाचले तिघांचे प्राण

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅनॉलमध्ये गेलेली कार पोलिस आणि नागरिकांनी क्रेनच्या साहाय्याने वेळीच बाहेर काढली.

मुदखेड तालुक्यातील बारड ते शेंबोली रस्त्यावर रविवारी रात्री ८.४५ वाजता (ता.२३) कार कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पडली. बारड महामार्ग पेालिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारमधील तिघांना सुखरूप बाहेर काढले. भोकर तालुक्यातील हसापूर येथील कोंडिबा जाधव (३५) हे कुटुंबासह कारमधून (एमएच २६ एएस ४९९९) जात होते. हँडब्रेक न लावता ते कारच्या खाली उतरले व कार पाण्यात पडली.

महामार्गावरील मृत्युंजय दूतची मोलाची मदत
अपर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून महामार्गावर होणाऱ्या अपघातामधील जखमींना तत्काळ मदत व्हावी यासाठी हायवे मृत्युंजय दूत ही संकल्पना राबवणे सुरू केले.त्यानुसार हायवे मृत्युंजय दूत बाळासाहेब देशमुख यांची मोलाची मदत झाली.

क्रेनद्वारे कार काढली
कारमध्ये जाधव यांची पत्नी रुक्मिणीबाई, मुलगी प्रगती, मुलगा विश्वास (९) हे तिघे अडकले होते. प्रकाश देशमुख व विठ्ठल जाधव यांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर काढले व उपचारासाठी बारड येथील रुग्णालयात दाखल केल व कार कॅनॉलच्या बाहेर काढली. डिकीतील बॅग व त्यातील मौल्यवान वस्तू व पैसे जाधव यांच्या ताब्यात दिले.

बातम्या आणखी आहेत...