आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लोकप्रतिनिधींना कोरोना:नांदेडमध्ये चार आमदारांनंतर आता खासदारालाही कोरोनाची लागण, भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर पॉझिटिव्ह

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रताप चिखलीकर यांच्यासह त्यांच्या मुलालाही कोरोनाची लागण, पिता-पुत्रावर औरंगाबादेत उपचार सुरू

नांदेडमध्ये कोरोनाने लोकप्रतिनिधींना विळखा घातल्याचे चित्र आहे. चार आमदारांनंतर आता भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. पिता-पुत्रावर औरंगाबादेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मार्च महिन्यापासून चिखलीकर पिता-पुत्र दोघेही मतदारसंघात कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी त्यांचा अनेकांशी संपर्क आला. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेले काँग्रेसचे दिग्गज नेते आणि ठाकरे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे आणि काँग्रेसचेच विधान परिषदेवरील आमदार अमरनाथ राजूरकर यांनी कोरोनावर मात केली आहे. तर हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर यांची गेल्या आठवड्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत.

0