आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक!:दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून लहान भावाचा केला खून; नांदेडमधील धक्कादायक घटना

नांदेड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारू पिण्यास पैसे दिले नसल्याच्या कारणावरून मोठ्या भावानेच लहान भावाचा खून केला. ही घटना नांदेड शहरातील चिरागगल्ली भागात २३ फेब्रुवारी रोजी घडली. मारेकरी मोठ्या भावास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

चिरागगल्लीमध्ये राहणाऱ्या गंगाबाई बालाजीसिंह ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ फेब्रुवारीच्या दुपारी त्यांचा मोठा मुलगा जुगनूसिंह ठाकूर याने त्याचा लहान भाऊ अरुणसिंह बालाजीसिंह ठाकूर याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पण, अरुणसिंहने पैसे दिले नाही, तेव्हा जुगनूसिंहने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाला.

इतवारा पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक आर.एस.मुत्त्येपोड यांच्याकडे देण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. मुत्येपोड आणि त्यांच्या सहकारी अंमलदारांनी जुगनूसिंह बालाजीसिंह ठाकूर (वय ३५) यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी जुगनूसिंहला पोलिस कोठडीत पाठवले आहे.

बातम्या आणखी आहेत...