आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:मोबाईलमध्ये बहिणीचा फोटो काढल्याच्या रागातून तरुणाचा खून, दोघांना अटक

नांदेड6 महिन्यांपूर्वीलेखक: शरद काटकर
  • कॉपी लिंक

बहिणीचा फोटो मोबाईलमध्ये काढल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना धर्माबाद येथील साठे नगर येथे राम मंदिराच्या परिसरात शनिवारी (ता.६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माझ्या बहिणीचे फोटो मोबाईलमध्ये का काढले असे म्हणून सचिन अरुण पत्रे (रा.सिद्धार्थ नगर, धर्माबाद) व रोहित भगवान जोंधळे (रा. साठे नगर) या दोघांनी आकाश शिवराम भंगारे (वय २०) याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आकाशा गंभीर जखमी झाला. त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सोहम मछरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी गंगासागर लक्ष्मण गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या दोघांवर धर्माबाद ठाण्यात शनिवारी मध्यरात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अवघ्या अडीच तासात सचिन पत्रे व रोहित जोंधळे या दोघांना अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...