आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय स्त्री मुक्ती व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहिले. आज त्यांच्या मुळेच प्रत्येक क्षेत्रात महिला उंच शिखरावर पोहोचल्या. त्यांनी चालविलेला शिक्षणाचा वारसा आज त्यांच्या लेकी पुढे चालवत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. अगदी कोरोना काळात लाॅकडाऊनमध्ये जुन ते ऑगस्ट दरम्यान, शिक्षक शाळेत जाऊ शकले नाहीत, अशावेळी शिक्षक मित्रांनी ही धुरा सांभाळली.
नांदेड जिल्ह्यातील रोही पिंपळगाव (ता.मुदखेड) जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता सातवीत शिकत असलेल्या ऋतुजा संभाजी शिंदे , सुजाता आनंदा शिंदे व तनुजा बालाजी शिंदे या तिघांनी स्वता:हून पुढे येत वसंतवाडी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीबाईंच्या या लेकींचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
वसंतवाडी येथील जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. ग्रामीण भागात बाहुतांश जणांकडे स्मार्ट फोन नाहीत. त्यातच नेटवर्कचीही अडचण येते. अशा ठिकाणी आॅनलाईन वर्ग ही संकल्पना उपयोगात येत नाही. दरम्यान, शिक्षक मित्र ही संकल्पना पुढे आली. यात १८ वर्ष वयोगटातील मुले पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांना शिकवतात. वसंतवाडीत याकामी मोठ्या गटातील मुले वेळ देऊ न शकल्यामुळे १३ ते १४ या लहान वयोगटातील या तिघी स्वतः हून शिकवण्यासाठी पुढे आल्या, असे सहशिक्षक संजय खानसोळे यांनी सांगितले.
सुरवातीला या तिघींनी नियोजन केले होते. तनुजाने मराठी विषय, ऋतुजा परिसर अभ्यास, इंग्रजी तर सुजाता गणित विषय शिकवत होती. पूर्वी वर्गात कधी सर नसले कि, या या तिघी वर्ग सांभाळत. त्यामुळे तो अनुभव त्यांच्या अंगी होता.
कोरोना नियमांचे पालन करून सकाळी नऊ वाजता शाळेला सुरवात होत होती. एक तास एका वर्गावर देत होत्या. याकाळात मुलांचे वाचन, धडा शिकविल्या नंतर प्रश्न उत्तर, गुणाकार, भागाकार, जोड अक्षर लिहीण्याचा सराव करून घेतला जात होता. तसेच रोजच्या शिकवणी बरोबरच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या वरील भाषणाची विद्यार्थ्यांकडून तयारीही करून घेतली जात होती. अभ्यास सोबतच मुलांचे खेळही घेत होते. दररोज तीस ते पन्नास विद्यार्थी शाळेत येत होती. जास्त विद्यार्थी असले की वर्ग शाळेच्या मैदानावर भरविले जात. आता शिक्षक आल्याने ते वर्ग घेत आहेत. या विद्यार्थीनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिकवण्याची आवड
घरि आल्यावर आम्ही आमचा अभ्यास करत होतो. शाळेचे एम.व्ही. कदम व सहशिक्षक संजय खानसोळे सरांचे आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळत होते. आम्हाला कोणतीच अडचण आली नाही. शिकविण्याची आवडत आहे.- सुजाता आनंदा शिंदे , विद्यार्थी, वसंत वाडी,ता.मुदखेड
विद्यार्थ्यांनीचे काम प्रशंसनीय
कोरोना काळात शिक्षण मित्रांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना काळातील ते योद्धे आहेत. वसंत वाडी येथील विद्यार्थ्यांनीचे काम प्रशंसनीय आहे. - प्रशांत डिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्रा.), नांदेड.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.